नाशिक : महापालिकेच्या महासभेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेसह विरोधीपक्षांनी सत्ताधारी भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विरोधकांना रोखण्यासाठी सत्ताधाºयांकडून नाना उपाय योजले जात असून त्याचाच एक भाग म्हणून महासभेत प्रत्येक हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.महापालिकेत सत्तेत येऊन भाजपाला सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या सात महिन्यांत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला प्रत्येक वेळी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही महासभांमध्ये शिवसेनेसह विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपाला नकोशी ठरू लागली आहे. त्यातच राजदंड पळविण्याची घटना घडल्यानंतर तर सत्ताधारी आणखीच सावध झाले आहेत. महासभेत विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांकडून त्यासाठी सभागृहाच्या सुरक्षिततेचे कारण पुढे केले जात आहे. सभागृहात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून, संपूर्ण राजीव गांधी भवन परिसरात ३८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेºयासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुुरुवात केली आहे. महापालिकेच्या काही सदस्यांकडे बंदूक बाळगण्याचे परवाने आहेत. सभागृहात शस्त्र जवळ बाळगण्यास सक्त मनाई असतानाही काही सदस्य बिनधास्तपणे सुरक्षारक्षकांना न जुमानता शस्त्र आतमध्ये घेऊन येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यासाठीही हे सीसीटीव्ही उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहेत.
महासभेवर राहणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:46 AM