शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कुशावर्तवर राहणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:56 AM

त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कुशावर्त परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी मंदिर प्रशासनाला देतानाच परिसरातील अतिक्रमणेही हटविण्याचे आदेश दिले. कुंभमेळ्याप्रमाणेच श्रावणी सोमवारचेही नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : श्रावणमासाच्या तयारीचा आढावा

त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कुशावर्त परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना त्यांनी मंदिर प्रशासनाला देतानाच परिसरातील अतिक्रमणेही हटविण्याचे आदेश दिले. कुंभमेळ्याप्रमाणेच श्रावणी सोमवारचेही नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.येत्या रविवारपासून श्रावणमासास प्रारंभ होणार आहे. श्रावण महिन्यात चारही सोमवारी भाविकांची मोठी गर्दी लोटण्याचा अंदाज आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी आढावा बैठक घेऊन तेथील अडचणी तसेच उपाययोजना जाणून घेतल्या. प्रशासकीय तयारीसंबंधीही त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीत बोलताना जिल्हाधिकाºयांनी सांगितले, श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेता सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करत सतर्क राहावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. त्याच बरोबर त्र्यंबकेश्वरचे सौंदर्य व पावित्र्यही राखले गेले पाहिजे. श्रावणी सोमवारी कुशावर्त तीर्थावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे कुशावर्त तीर्थाचा भाग हा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणावा. त्यासाठी मंदिर प्रशासनाने या भागात त्वरित सीसीटीव्ही लावण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करावी.श्रावण महिन्यात रविवार आणि सोमवार ह्या दोन्ही दिवशी मांसाहार विक्री बंद ठेवण्यात यावी. याबाबत पोलीस पथकांनी सतर्क राहून परिसरातील ढाबे तसेच हॉटेलवर छापे मारून कारवाई करावी, असेही आदेश दिले. परिसरात प्लॅस्टिकचा वापर टाळावा. ब्रह्मगिरी, गंगाद्वार याठिकाणी प्रदक्षिणादरम्यान मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आढळून येते. प्लॅस्टिक वापरणाºया भाविकांना दंड आकारून महत्त्वाच्या भागांमध्ये नगरपरिषदेतर्फे स्टॉल लावून जनजागृती करावी.भाविकांना कागदी पिशव्यांचे वाटप करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. बैठकीला नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, तहसीलदार महिंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस निरिक्षक रवींद्रकुमार सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरु रे, वनविभागाचे कैलास अहिरे, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर, नगरसेवक विष्णू दोबाडे, त्रिवेणी तुंगार, माधवी भुजंग, सायली शिखरे,समीर वैद्य, एसटीचे शरद झोले आदी उपस्थित होते.अधिकाºयांची कानउघडणीबैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी राहुल पाटील, ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गोरे यांच्या समवेत कुशावर्तावर जाऊन पाहणी केली. कुशावर्तावर असलेल्या अतिक्रमणाबाबत त्यांनी अधिकाºयांची कानउघडणी केली. तेथील टपºया काढण्यास भाग पाडले. स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबतही त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पालिकेला तंबी दिली.

टॅग्स :GovernmentसरकारPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी