नांदगाव : येथील दिडशे वर्षे जुन्या जैन मंदिरात भगवान महावीरांची जयंती घंटा व थाळी नाद करून साजरी करण्यात आली. मंदिराच्या इतिहासात प्रथमच लॉकडाऊनमुळे जयंतीनिमित्त होणारा उत्सव रद्द करण्यात आला. प्रत्येक वर्षी सकाळी सहा वा. प्रभात फेरी व दिवसभरात झेंडा वंदन, भंडारा, पालखी, व्याख्यान व पाळणा असे कार्यक्र म आयोजित करण्यात येतात. शहरातील सुमारे 500 जैन यात सहभागी होत असतात. मात्र कोरोनाच्या पाशर््वभूमीवर पंडित आशिष जैन, सोनपाल पांडे, व संतोष शर्मा या तिघांनीच अभिषेक केला. तसेच महिलांनी टाळ्या वाजवून व थाळी नाद करून महावीर यांचा जन्मोत्सव साजरा केला. घराघरातून नमोकार मंत्राचे आवर्तन व थाळ्याचा निनाद गुंजला.
घंटानाद करीत भगवान महावीरांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 2:46 PM