नाशिक : प्रत्येकाच्या अंगात परमेश्वराने कला दिली आहे. त्याची जोपासना करा आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवा, असे प्रतिपादन अभिनेत्री डॉ. सई लळीत यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि इ. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. सई लळीत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. अश्विनी दापोरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी लळीत यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्ट पाहिली आणि वाचली पाहिजे. रंगभूमी अथवा चित्रपटसृष्टीत ग्लॅमर आहे. त्यातून पैसा आणि प्रतिष्ठा मिळू शकते. विविध एकांकिका, नाटकांमधून आपण स्वत:ला सिद्ध करू शकतो, असेही लळीत यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. संगीता जगदाळे यांनी केले. प्रा. सुरेखा दळवी यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाक्चौरे, उपप्राचार्य एस. के. निकम, एस. एस. शिंदे, प्रा. शैला सानप आदि उपस्थित होते.
परमेश्वरी कलेची जोपासना करा : लळीत
By admin | Published: September 30, 2015 11:32 PM