इगतपूरी : तालुक्यातील दुर्गम जि.प.प्राथमिक शाळा बलायदुरी शाळेचा वाढदिवस आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय इमारतीची सजावट केली. अध्यक्षस्थानी सरपंच कैलास भगत होते. शाळेतील प्रथम विद्यार्थी गणपत राक्षे, धोंडीराम भगत नारायण पवार, सुंदर भगत यांचे हस्ते सरस्वती व सावित्री पुजन करून केक कापून वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी फलके यानी केली. शाळेची यथोगाथा पदविधर शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी सांगतांना २० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली पहिली ते चौथीपर्यत असणारी बलायदुरी जिल्हा परिषद शाळा सातवीपर्यंत झाली. त्यानंतर आज नामांकित व प्रगत शाळा म्हणून तालुक्यात नावारूपास ही शाळा आली असल्याचे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी गोपाळ भगत, योगिनाथ भगत, कल्पना नाठे, प्रकाश भगत, नवनाथ भगत, रमेश राक्षे यांनी शाळेविषयी आदरभाव मनोगत व्यक्त केली. शाळेच्या आठवणी सांगतांना माजी विद्यार्थि भाराउन गेले होते. यावेळी दप्तरमुक्त शाळा कार्यक्र म साजरा करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी दांडियाचा मूक्त आनंद घेण्यात आला.याप्रसंगी काळू गठखळ, तुळशिराम चव्हाण ,शिक्षक अशोक बोराडे, प्रकाश सोनवणे,सचिन गायकवाड,भिला आहिरे, प्रशांत भदाणे, सुनंदा आहिरे, किर्तिबाला बागूल आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक बोराडे यांनी केले व आभार सुनंदा अहिरे यांनी मानले.
बलायदुरी शाळेचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:53 PM