शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नाशकात शिवराय ते भिमराय जन्मोत्सव साजरा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:18 PM

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देपुरोगामी संघटनांचा निर्णय : तीन महिने चालणार उपक्रमजन्मोत्सवाला १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरूवात

नाशिक : महाराष्ट्रातील सध्याचे जातीय तणावाचे वातावरण पहाता नाशिकमधील परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरूणांपर्यंत या महापुरूषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरूषांच्या नावे फूट पाडणा-यांना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात गुरूवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयात बैठक घेण्यात आली व त्यात जन्मोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या जन्मोत्सवाला १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून सुरूवात करण्यात येणार असून, ११ एप्रिल रोजी फुले जयंती व १४ एप्रिल रोजी भीमजयंती या समितीद्वारे साजरी केली जाईल. या दरम्यान १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशा नाशिक शहरातून निघणा-या शिवपालखी सोहळ्यात ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव’ समितीतर्फे पाणी वाटप तसेच डॉ. आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचाराचे फलक एकत्रितरित्या प्रदर्शित करून समाजप्रबोधन करण्यात येईल. शिवराय ते भीमराय या विषयावर निबंधस्पर्धा व हिडीओ ब्लॉग स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले.या उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंग, छात्रभारती, मार्शल ग्रृप, विवेकवाहिनी या पक्ष व संघटनांचा सहभाग असून, अन्य पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीची पुढील बैठक १० फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सायंकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीस राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेशा कापसे, सुरेश नखाते, अभिजीत गोसावी, विशााल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, शरद कोकाटे, करूणासागर पगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :social workerसमाजसेवकNashikनाशिक