सायखेडा : प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अपंग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आले.
तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिले. तसेच तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिव्यांग बांधवांना योजनांची माहिती व मार्गदर्शन केले. सुभाष कराड यांनी दिव्यांग बांधवांविषयी मनोगत व्यक्त केले. प्रहार दिव्यांग संघटनेचे निफाड तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धुमाळ यांनी संजय गांधी योजनेचा निधी हा दर महिन्याला विधवा, निराधार व दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा व्हावा तसेच अंत्योदय कार्ड हे प्रत्येक दिव्यांग बांधवांना मिळावे, अशी मागणी केली. यावेळी दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष विकास खडताळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, जयेश जगताप, अमोल ब्राह्मने, सनी गोसावी, संदीप क्षीरसागर, गणेश राजोळे, अशोक पवार, सुभाष जाधव, संजय शिंदे, विलास गायकवाड, संदीप भुजबळ, मछिंद्र पवार, दिलीप अहिरे व असंख्य दिव्यांग महिला व बांधव उपस्थित होते.