दिंडोरी येथील शेषराव महाराज भक्त मंडळाचे वतीने कावडीधारकांनी नाशिक पंचवटी, त्र्यंबकेश्वर, शिवतीर्थ टाकेद व कावनई येथून गोदावरीचे जल आणून, शहरातून मिरवणूक काढली. त्यानंतर रामेश्वर बंधारा येथील महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्ती संघटनेचे राज्यध्यक्ष सुधाकर चारोस्कर, विमल चारोस्कर, सुमन कडाळे, शांताबाई कडाळे, अनिल हांडगे, दत्तू कडाळे, सोमनाथ चारोस्कर, सुरज बोके, बिबाबाई शेखरे, मनिषा चारोस्कर आदींसह भाविक सहभागी झाले होते.
दिंडोरीत पर्जंन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:20 PM