कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तसेच पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात बुधवारपासून येत्या २२ तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण रमजान पर्व मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या सावटामध्ये पार पडले. नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने कडक उन्हाळ्यात निर्जळी उपवास करत श्रद्धा, संयम व सदाचाराचे धडे गिरविले. या औचित्यावर आपापल्या घरांमध्ये नमाजपठण करत गोड खाद्यपदार्थ तयार करत फातिहापठण करावे. आपला मित्र परिवार, आप्तस्वकीयांसोबत मोबाइलवरून संपर्क साधत ईदच्या शुभेच्छा देत आपुलकीने विचारपूस करावी, असेही शहरातील धर्मगुरूंनी सांगितले.
---कोट---
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहाजहांनी ईदगाह मैदानावर ईदचे नमाजपठण यावर्षी होणार नाही. तसेच मशिदींमध्येही नमाजपठणाला पाच ते दहापेक्षा अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी घरीच नमाजपठणास प्राधान्य द्यावे. कोरोनाच्या उच्चाटनासाठी प्रत्येकाने दुवा करावी. शासनाच्या नियमावलीसह धर्मगुरूंच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाची लाट संपुष्टात आल्यानंतर मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने येणारी ईद व अन्य सण, उत्सव साजरे करूयात.
- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक (फोटो आरवर ११खतीब)
--
रमजानचा सण सर्वांनी उत्साहात, आनंदाने साजरा करावा. अतिउत्साह न दाखविता शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे ईदगाहवर नमाजपठणाचा सोहळा शहर-ए-खतीब यांनी शासनाच्या आदेशानुसार रद्द केला आहे. मशिदींमध्येही मर्यादित लोकांना नमाजपठणाला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मशिदींमध्येही गर्दी करू नये. कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबाबत अधिक खबरदारी घ्यावी.
-मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलवी, दुधाधारी मशीद, कथडा (फोटो आरवर ११आसिफ)
--
रमजानचा सण सर्वांनी साध्या पद्धतीने साजरा करावा. आपल्या परिसरात तसेच आजूबाजूला ईदच्या दिवशी कोणीही उपाशीपोटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. नवीन कपड्यांसह अन्य वस्तूंची खरेदी आगामी सण, उत्सवांच्या औचित्यावर करावी. बडी दर्गाही महिनाभरापेक्षा अधिक काळापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ईदच्या दिवशीही दर्गा बंदच राहणार आहे. यामुळे भाविकांनी परिसरात दर्शनासाठी गर्दी करू नये. शासनाच्या आदेशाचे पालन करत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
- सैय्यद वसीम पीरजादा, विश्वस्त बडी दर्गा (११पिरजादा फोटो आरवर)
--
ईदवर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट दुर्दैवाने आले आहे. रमजान पर्वदेखील कोरोनाच्या सावटाखालीच पार पडले. समाजबांधवांनी ज्याप्रमाणे संयमाने रमजान पर्व साजरा केला त्याचप्रमाणे ईदचा सणही साजरा करावा. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. ईदचे नमाजपठण घरातच करण्यावर भर द्यावा.
- मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, मौलवी, हेलबावडी मशीद, दूधबाजार (फोटो नाही)
===Photopath===
110521\11nsk_26_11052021_13.jpg~110521\11nsk_27_11052021_13.jpg~110521\11nsk_28_11052021_13.jpg
===Caption===
धर्मगुरु नाशिक~ धर्मगुरु नाशिक~ धर्मगुरु नाशिक