सिडको : येथील उंटवाडी म्हसोबा देवस्थान यात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी रोमहर्षक कुस्त्यांच्या दंगलीने शानदार समारोप झाला. यावेळी स्पर्धेत मालेगावच्या सोनू शिरसाठ याला आस्मान दाखवित नाशिकच्या ज्ञानेश्वर बेंडकुळे याने विजेत्याचा मान पटकावला. दोन दिवसीय यात्रोत्सवादरम्यान शनिवारी म्हसोबा देवस्थानची महापूजा तसेच सायंकाळी पार्श्वगायिका रेखा महाजन प्रस्तुत स्वरसंगम वाद्यवृंदाच्या मराठी भावगीत, भक्तिगीत, लावणी गीतांचा कार्यक्रम झाला. यात्रोत्सवात पहिलवानांमध्ये कुस्त्यांची खुली स्पर्धा घेण्यात आली. विजेता मल्ल बेंडकुळे यास मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसासह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी यात्रा पंचकमेटीचे विठ्ठलराव तिडके, केशवराव पाटील, बाजीराव तिडके, मधुकर तिडके, दत्ता पाटील, जगन पाटील, दादा कापडणीस, राम पाटील, सदाशिव नाईक, रामचंद्र तिडके, फकिरराव तिडके, अंबादास जगताप, सुरेश जगताप, राजेश गाढवे, विलास जगताप, प्रवीण जगताप, सुनील जगताप आदी उपस्थित होते.
म्हसोबा यात्रोत्सवात दर्शनासाठी रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:34 AM