संगमेश्वर : मालेगाव शहर परिसरात तरूण वर्गाबरोबरच बालकांनी विविध उपक्रमाद्वारे ‘मैत्रीचा दिवस’ साजरा केला.आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर मित्र दिवस साजरा केला जातो. रविवारची साप्ताहीक सुटीही असते. शाळा, महाविद्यालयांना तसेच शासकीय वा खासगी कार्यालयांचे कामकाज बंद असते. निसर्गरम्य वातावरणात मित्र मैत्रिनींनी एकत्र येत सहलीचा आनंद घेत एकमेकांच्या हातावर मैत्रीचे बेल्ट बांधत शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने एकमेकांना विविध भेटवस्तू, चॉकलेट दिल्या. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना मैत्रीचे धागे बांधले.सामाजिक संस्थांनी अनोख्या पद्धतीने मैत्रीचा दिवस साजरा केला. राष्टÑसेवा दलाच्या, संगमेश्वर शाखेच्या वतीने बालसैनिकांनी एकमेकांना मैत्रीचा धागा बांधला. तसेच पर्यावरणाशी मैत्री करुन झाडांनाही मित्र म्हणून स्विकारले आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली.यावेळी मैत्री काय असते. मैत्री कशी असावी, मैत्रीच्या विषयी कथाकथनद्वारे मनमोकळ्या गप्पा झाल्या. तसेच वाघबकरी व डुक्कर मुसंडी हे खेळ खेळण्यात आले. शाखानायक यश मंडाळे, उपशाखा नायक सोहम महाजन, स्वाती वाणी आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सोशल मिडियाद्वारे अनेकांनी विविध संदेश देत मैत्री दिन साजरा केला. दिवसभर संदेश वहन चालू होते. त्यामुळे मोबाईलचे इनबॉक्स फुल्ल झाले होते.शहराताालकांनी विविध उपक्रमाद्वारे ‘मैत्रीचा दिवस’ साजरा केला. सामाजिक संस्थांनी अनोख्या पद्धतीने मैत्रीचा दिवस साजरा केला. राष्टÑसेवा दलाच्या, संगमेश्वर शाखेच्या वतीने बालसैनिकांनी एकमेकांना मैत्रीचा धागा बांधला. तसेच पर्यावरणाशी मैत्री करुन झाडांनाही मित्र म्हणून स्विकारले आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. यावेळी मैत्री काय असते. मैत्री कशी असावी, मैत्रीच्या विषयी कथाकथनद्वारे मनमोकळ्या गप्पा झाल्या. तसेच वाघबकरी व डुक्कर मुसंडी हे खेळ खेळण्यात आले.
वृक्षांना धागे बांधून मैत्री दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:12 PM
संगमेश्वर : मालेगाव शहर परिसरात तरूण वर्गाबरोबरच बालकांनी विविध उपक्रमाद्वारे ‘मैत्रीचा दिवस’ साजरा केला. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर मित्र दिवस साजरा केला जातो. रविवारची साप्ताहीक सुटीही असते. शाळा, महाविद्यालयांना तसेच शासकीय वा खासगी कार्यालयांचे कामकाज बंद असते. निसर्गरम्य वातावरणात मित्र मैत्रिनींनी एकत्र येत सहलीचा आनंद घेत एकमेकांच्या हातावर मैत्रीचे बेल्ट बांधत शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने एकमेकांना विविध भेटवस्तू, चॉकलेट दिल्या. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना मैत्रीचे धागे बांधले.
ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ