नाशिकरोड : रेल्वेस्थानकातील निराधार, भिक्षूक, बालकामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या रेल्वे चाइल्ड लाइन १०९८ संस्थेतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानकात दोस्ती सप्ताह साजरा करण्यात आला.दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, अभियंता प्रवीण पाटील, अशोक जाधव यांच्या हस्ते झाले. दोस्ती सप्ताहानिमित्त नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर चाइल्ड लाइन १०९८ या संस्थेच्या कामकाजाची माहिती भव्य रांगोळी काढून देण्यात आली होती. चाइल्ड लाइन १०९८ ही संस्था देशातील ५४१ जिल्हे आणि ११४ रेल्वेस्थानकांमध्ये चोवीस तास कार्यरत असते. घरातून पळून येऊन रेल्वेस्थानकात राहणारी, अनाथ, निराधार मुले, बालकामगारांना या उपक्र मातून मदत केली जाते. यावेळी चाइल्ड लाइनच्या समन्वयिका सुवर्णा वाघ, विजय माळी, शीतल कानेटकर, सायली चौधरी, ज्योती शिंदे, भाग्यश्री गायकवाड, जयेश शिसोदे, मनीषा मरकड, रेखा शिंदे आदी उपस्थित होते.
नाशिकरोड रेल्वेस्थानकात ‘दोस्ती सप्ताह’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:43 AM