शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

सार्वजनिक ऐवजी घरोघरी गणेशोत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 3:47 PM

सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस ठाणे : सिन्नर येथे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने चांडक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत व्यासपिठावर अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधिक्षक माधव रेड्डी, तहसिलदार राहूल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार आदी उपस्थित होते.गर्दी कमी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. त्यामूळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना महिनाभर आधीच जाहीर केल्या आहेत. गेल्या चार साडेचार महिण्यांपासून पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, नगर परिषद या सर्वच यंत्रणांवर ताण आला असून या उत्सवाच्या काळात हा ताण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर परिषदेने गणेश विसर्जनासाठी उपनगरांमध्ये कृत्रिम तळे तयार करावेत अशी सूचनाही वालावलकर यांनी केली.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, दत्ता वायचळे, डॉ. व्ही.एम. अत्रे, डॉ. विजय लोहरकर, भाऊसाहेब शिंदे, प्रा. आर.के. मुंगसे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी विविध सुचना केल्या. पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. -गणेशाच्या आगमनाच्या वेळी व विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढता येणार नाही. कारण राज्यात अजूनही संचारबंदी लागू असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनीक गणेश मंडळांना परवानगी मिळणार नाही. मात्र, घरामध्ये गणेशाची स्थापना करण्यास कुठलीही अडचण नाही. सार्वजनिक गणेश मंडळांना नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून यापूर्वी असर्णा­या नियमांबरोबरच यंदा मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरची व्यवस्था मंडळांना करावी लागेल असे बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :ganpatiगणपतीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी