नाशिक- निर्माल्य दान त्यानंतर विसर्जित गणेश मूर्ती दान आणि आता पर्यावरण स्नेही उत्सव अशा विविध टप्प्यातून जनतेला सुखावेल असा उत्सव साजरा करण्यााबत आता जागृती झाली आहे. त्या मागे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य मोठे आहे. श्रध्देला धक्का न लावता ही लोकचळवळ झाली आहे. अर्थात, सोमवारपासून राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत असताना तो उत्सव असावा मात्र उथळपणा त्यात नसावा असे मत समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.प्रश्न- पर्यावरण पूरक गणेशोत्सव सुरू करण्याच्या महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या आता पर्यंतच्या चळवळीकडे बघून काय वाटते ?पाटील: अंधश्रध्दा निर्मुलन समिती स्थापन होऊन सुमारे ३५ वर्षे झाली तर निर्माल्य मूर्ती दान आणि मूर्ती दानाची संकल्पना राबवून सतरा ते अठरा वर्षे झाली आहेत. कोल्हापुर येथे पंचगंगा नदी प्रदुषीत होऊ नये यासाठी सर्व प्रथम निर्माल्य दानाची संकल्पना राबविण्यात आली आणि नंतर ती पुढे अनेक जिल्ह्यात राबविली गेली. पुढे श्रध्दास्थानाला धक्का न लावता विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची संकल्पना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राबवली. त्यालाही प्रतिसाद मिळु लागला. नाशिक शहरात तर दरवर्षी मूर्ती दान लाखापेक्षा अधिक होते. त्यावेळी समितीने उत्सव पर्यावरणपुर्वक कसा साजरा करावा यासाठी प्रदर्शन तयार करून घेतले होते त्यातील भित्ती चित्रे अनेक मंडळांच्या देखाव्यात वापरली जात होती. ध्वनीक्षेपकावर मर्यादा, प्लास्टीक बंदी, वेळेचे बंधन ही त्यावेळी प्रदर्शनात असलेली चित्रेच आज पर्यावरण पूरक गणेशोत्सव म्हणून अमलात येत आहेतप्रश्न: शासनाचा प्रतिसाद कसा आहे, आणखी काय केले पाहिजे?पाटील : मुळात कोणत्याही उत्सवात होणारे प्रदुषण रोखण्याासाठी जबाबदारी निश्चीत झाली पाहिजे यासाठी समितीच्या कार्यकर्त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याबाबत पहाण्याची जबाबदारी उच्च न्यायलयाने दिली. शासनाने नियम केले वगैरे ठीक आहे. परंतु शासनाचे प्रदुषण नियंत्रण विभाग अत्यंत पंगू आहे. तेव्हा आर्थिक तरतूद आणि सुविधा देऊन असे विभाग सक्षम केले पाहिजे.प्रश्न: यंदा होऊ घातलेल्या गणेशोत्सवाविषयी काय सांगाल?पाटील : पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागृकता झाली आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप बदलु लागले आहे. त्यात गैरप्रकार देखील होऊ लागले आहेत. तथापि, मनुष्य हा समाजशील असल्याने एकत्र येण्याचे साधन म्हणून उत्सवाकडे बघायचे ठरले तर त्यातील उथळपणा थांबला पाहिजे. उत्सवाबाबत मुल्यमापन झाले पाहिजे.मुलाखत- संजय पाठक
गणेशोत्सव साजरा करा, मात्र उथळपणा नको: महाराष्टÑ अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:28 PM
नाशिक- निर्माल्य दान त्यानंतर विसर्जित गणेश मूर्ती दान आणि आता पर्यावरण स्नेही उत्सव अशा विविध टप्प्यातून जनतेला सुखावेल असा उत्सव साजरा करण्यााबत आता जागृती झाली आहे. त्या मागे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य मोठे आहे. श्रध्देला धक्का न लावता ही लोकचळवळ झाली आहे. अर्थात, सोमवारपासून राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत असताना तो उत्सव असावा मात्र उथळपणा त्यात नसावा असे मत समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देपर्यावरण स्नेही उत्सवासाठी समिती आग्रहीलोकांमध्ये प्रबोधन चांगले झाले आहे