नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी (दि.१ आॅगस्ट) येणारी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील पोलीस दूरक्षेत्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत गलांडे हे बोलत होते. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, विकास काळे, पोलीस हवालदार प्रवीण अंढागळे, सुधाकर चव्हाणके, नवनाथ आडके, प्रकाश उंबरकर आदींनी मार्गदर्शन केले.कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्र मांना बंदी आहे. त्याला अनुसरून ईद घरातच साजरी करावी असे आवाहन गलांडे यांनी केले. सर्व धार्मिक कार्यक्र म करताना सोशल डिस्टनचा वापर करावा. ईदसाठी लागणारे साहित्य आॅनलाईन अथवा फोनवरून खरेदी करावी. बाधित क्षेत्राला सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार असून त्यात कोणत्याही प्रकारचे शिथीलता देण्यात येणार नाही. नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले. बैठकीस बिलाल तांबोळी, अमिन तांबोळी, युसुफ सैय्यद, साहिल मणियार, अन्सार सैय्यद, शहाबाज मणियार, फयाज तांबोळी, शाहबाज शेख आदीसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.
बकरी ईद घरातच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 2:47 PM
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी (दि.१ आॅगस्ट) येणारी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.
ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन