मुख्याध्यापक एस. पी. सावंत यांच्या नियोजनानुसार जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थिनी व माता पालक यांच्यासाठी स्त्रियांचे आरोग्य या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थिनी व माता पालक यांना स्त्रियांच्या आरोग्यविषयक डॉ. मनीषा कापडणीस यांनी मार्गदर्शन केले. स्त्रियांनी निरोगी राहण्यासाठी आहार, स्वच्छता व शारीरिक समस्या तसेच स्त्री ही आयुष्यात तीन अवस्थेतून जाते. एक बालपण, दुसरे लग्नानंतर जेव्हा ती माता होते. तसेच वयाच्या ४० ते ५० वर्षांनंतर मेनोपॉज या अवस्थेतून जाते तेव्हा आपले आरोग्य कसे ठेवावे, या विषयांवर त्यांनी माहिती दिली. व्याख्यानाचा व्हिडिओ विद्यार्थिनींना व्हाॅट्सॲपद्वारे पाठविण्यात आला. मुख्याध्यापक एस. पी. सावंत व पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विशाखा समितीच्या प्रमुख एस. बी. खैरनार, महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख बी. एम. अहिरे, एम. बी. पवार या उपस्थित होत्या.