नाशिक : शहरातील अनेक शाळांमध्ये हिंदी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हिंदी राष्ट्रभाषा जनजागृतीसाठी हिंदी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात आले. श्रमिकनगर, सातपूर येथील श्यामलाल गुप्ता हिंदी विद्यालय व ललिता प्रसाद पोद्दार अकादमीच्या वतीने हिंदी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नंदकिशोर भुतडा, ओमप्रकाश गोयल, डॉ. भरतसिंह, श्यामशरण शर्मा, अलका कुलकर्णी आदिंनी कविता सादर केल्या. याप्रसंगी गुलाबप्रसाद पांडे, सुरेश गुप्ता, सी. जी. मिश्रा, द्वारका प्रसाद तिवारी आदि उपस्थित होते. महाराष्ट्र हायस्कूलभा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर या शाळेत हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्ता गोसावी होते. प्रास्ताविक वंदना ठाकूर यांनी केले. यावेळी मोनिका गावित यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. हिंदी दिनानिमित्त अंकिता सोनवणे, प्रतीक्षा गांगुर्डे, गौरव साळवे, स्रेहा बिडलॉन या विद्यार्थ्यांनी हिंदी काव्य सादर केले. सूत्रसंचालन शालेय पंतप्रधान प्रतीक्षा गांगुर्डे हिने केले. आभार शालेय सांस्कृतिक मंत्री साक्षी बनकर हिने मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. के. के. वाघके. के. वाघ सी. बी. एस. ई. स्कूल येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रभाषा हिंदीचा नारा, हिंदीचा जयघोष, साहित्यिकांचे सुवचन, दोहे यांनी परिसरात हिंदीमय वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सुरुवात कविता व गीते सादर करून करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रभाषेचे महत्त्व सांगणारे भाषण, राधा-कृष्ण यांच्या प्रेमकथेवर आधारित नृत्य सादर कारण्यात आले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापक अश्विनी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. पेठे विद्यालयनाएसो संचलित रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात शालेय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना एक नाटिका सादर केली. दुपारच्या सत्रात कथाकथन व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी सोहम दाणी, गिरीश शिरसाठ, शीतल कठाळे आदि विद्यार्थ्यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांना प्रियंका निकम, कैलास पाटील, विजय पाटोळे, कुंदा जोशी आदिंनी मार्गदर्शनपर भाषणे केली. उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे व मुख्याध्यापक गीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. भविष्य निर्वाह निधी कार्यालयभविष्य निर्वाह निधी कार्यालयात हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयात आयुक्त जगदीश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हिंदी निबंध लेखन, टिप्पन आलेखन, वकृत्व आदिंसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पंधरवडा समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून करन्सी नोट प्रेसचे प्रमुख प्रबंधक संदीप जैन, भविष्य निधी आयुक्त जगदीश तांबे, सहायक आयुक्त हेमंत राऊत, देवेंद्र सोनटक्के, शैलेंद्र सिंह आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक हेमंत राऊत यांनी केले. देवेंद्र ढोले यांनी स्वागत केले. अनिल पन्हाळे यांनी सूत्रसंचालन तर आर. डी. शिरसाठ यांनी आभार मानले.
शहरातील शाळांमध्ये हिंदी दिवस साजरा
By admin | Published: September 26, 2015 10:34 PM