येवला : तालुक्यातील धामोडे येथील अतिक्रमण हटवून रस्ता खुला केला गेल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
तालुक्यातील धामोडे येथील मोती नाला या नदी-नाल्यालगत अतिक्रमण करून, समांतर असणाऱ्या रस्त्यात नदी प्रवाहित केली गेल्याने परिसरातील ग्रामस्थांचा रस्ता खंडित होऊन गावाशी संपर्क तुटला होता. अतिक्रमण हटवून मूळ रस्ता त्वरित मोकळा करावा, या मागणीसाठी धामोडे ग्रामस्थांनी तहसील आवारात उपोषणही आरंभले होते. तहसीलदार प्रमोद हिले यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण थांबविण्यात आले होते.
तहसीलदार हिले यांनी दोन पोकलँड, तीन जेसीबीच्या साहाय्याने सलग दोन दिवस स्वतः हजर राहून अतिक्रमण हटविले. रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदार हिले यांचे आभार मानत, एकमेकांना पेढा भरवत आनंदोत्सव साजरा केला.
‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला पंचायत समितीचे अभियंता व कर्मचारी, इमारत व दळणवळणचे अभियंता व कर्मचारी, भूमी अभिलेखचे सर्व कर्मचारी, सहभागी झाले होते.
फोटो- २२ धामोडे रोड
220921\22nsk_52_22092021_13.jpg
फोटो- २२ धामोडे रोड