उदोजी मराठा बोर्डिंग येथे ध्वजारोहण करून समाजदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांच्यासह डॉ. एन. एस. पाटील, प्रा. एन. बी. देसले, प्रा.कैलास भोये, दिप्ती पटेल, सीमा जाधव, स्वाती वाडेकर-दळवी, शैलेश यावलकर, सोनाली मेधने, तुषार दिंडे, शुभम पाटील आदी.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म दिना निमित्ताने बुधवारी (दि. १९ ) समाजदिन साजरा करण्यात आला. संस्थेचा मुख्य समाज दिन सोहळा उदोजी मराठा बोर्डिंग येथे संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आला.याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील,प्रा. एन. बी. देसले, प्रा.कैलास भोये, दिप्ती पटेल, संग्रहालय व्यवस्थापक सीमा जाधव, संग्रालय संरक्षक स्वाती वाडेकर-दळवी, शैलेश यावलकर, सोनाली मेधने, तुषार दिंडे, शुभम पाटील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.माविप्र संस्थेत कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त १९ आॅगस्ट १९८२ पासून समाजदिन म्हणुन साजरा करण्यास सुरुवात झाली . बुधवारी समाज दिनानिमित्त के टी एच एम महाविद्यालयात ध्वजवंदन, राष्ट्रगीत तसेच समाजगीत कार्यक्रमंसोबताच कर्मवीरांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चिटणीस डॉ.सुनिल ढिकले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते,तर प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.दिलीप पवार यांनी केले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, माविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूल, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात, होरायझन शाळेतही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून समाज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजदिनानिमित्त गौरव लांबे या विद्यार्थ्याची मिशन आॅलिम्पिकसाठी निवड झाल्याबद्दल, दत्ता बोरसे याची नायब तहसीलदारपदी निवडीबद्दल,स्वप्ना कापडी ही एमएस्सी रसायनशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल तसेच दिपाली चारोस्कर हिने कोरोना काळात स्वत: मास्क बनवून त्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचा उपयोग गरीब कुटुंबासाठी केल्याबद्दल,तसेच भावेश कळमकर या एन सी सी नेव्हल विद्यार्थ्याचा पाच देशांचा दौरा करून भारताचे नेतृत्व केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.