संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली अण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश विनायक लोंढे, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे शहरी विभाग अध्यक्ष एस. बी. मुलाणी, महासंघाचे मुरलीधर निकाळे उपस्थित होते. प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश लोंढे यांनी, ज्येष्ठांसाठी असणार्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती देऊन सुसंवाद व आनंदी जगण्याने स्वत:सह कुटुंब व समाजाचे जगणे सुसह्य करण्याचा मंत्र सांगितला. मुलाणी, निकाळे यांनी मार्गदर्शन करताना ज्येष्ठांसाठी सरसकट करसवलत द्यावी तसेच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापण्याची मागणी केली.
प्रास्ताविक सीताराम निकुंभ यांनी, तर सूत्रसंचालन कृष्णा शिंदे यांनी केले. नंदलाल भांबारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सतीश गुप्ता, नारायण बोरसे, भगवान लोंढे, प्रल्हाद कोतवाल, प्रताप देशमुख, अरुण भांडगे, शिवाजी लोणारी आदींसह संघाचे सदस्य उपस्थित होते.