जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक, ता. येवला येथील ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून चव्हाण वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी चार महिने अगोदरच दिवाळी साजरी केली.चिचोंडी बुद्रुक येथील आदिवासी चव्हाण वस्तीवर अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन मार्गी लागल्याने पस्तीस वर्षांनंतर प्रथमच महिलांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे या वस्तीवरील महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. , नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे सदस्य नंदु घोटेकर, सदस्या सविता धीवर, सरपंच रविंद्र गुंजाळ, ग्रामसेवक परसराम पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण खराटे, नंदू घोटेकर ,दत्तू कुटे , मच्छिंद्र मढवई, शोभा मढवई ,दत्तू माळी, अनिल मढवई, बाळु चव्हाण, भास्कर चव्हाण, साहेबराव गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, देवराम चव्हाण, गोकुळ चव्हाण, आशाबाई गुंजाळ, गवळाबाई गुंजाळ आदी उपस्थित होते. पिण्याचा पाण्याची समस्या ३५ वर्षानंतर मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी साखर भरवून आनंद व्यक्त केला.कोणतीही गोष्ट अशक्य नाहीचव्हाण वस्तीवर नळाद्वारे पाणी आल्याने सर्व लोक खूप आनंदीत झाले आहेत. खरच जिद्दीने काही काम केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधान आहे.- सविता धीवर, ग्रामपंचायत सदस्य.
चिंचोडीच्या चव्हाण वस्तीवर दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 5:04 PM
पाणीप्रश्न मार्गी : ३५ वर्षानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा
ठळक मुद्देवस्तीवरील महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे