नाशिक : देशी-विदेशी संगीताच्या तालावर ठेका धरणाºया आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या एकाहुन एक प्रसिद्ध बँड्सच्या सादरीकरणाने ‘सुला फेस्ट-२०१८’चा रविवारी (दि.४) जल्लोषात समारोप झाला. सुला फेस्टकरिता देश-विदेशांतून नाशिकमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांनी रोमांचित करणाºया संगीताच्या साथीने वाइनचा पर्यटनाचा आस्वाद घेत दोन दिवस जल्लोष केला. या दोन दिवसांत येथे आलेल्या पर्यटकांनी ठिकठिकाणी सेल्फी घेत संगीताच्या धूनवर ठेका धरला. आपल्या सोबत आणलेल्या कॅमेºयात अथवा मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपण्यासह रोमांचक आठवणी नोंदवताना तरुणाईमध्ये उत्साह संचारला होता. वातावरणातील गार वारा, सुमधुर संगीत अशा उत्साही वातावरणात सुला विनियड्सच्या निसर्गरम्य प्रांगणात अॅम्फी थिएटर, आत्मोसफियर येथे दोन दिवसांत वेगवेगळ्या म्युझिशियन्सनी त्यांचा कलाविष्कार सादर केला. या रोमहर्षक सुला फेस्टचा अमित त्रिवेदीच्या सादरीकरणाने रविवारी जल्लोषात समारोप झाला. या समारोपाच्या सुला फेस्टमध्ये सहभागी झालेले पर्यटक त्यांच्या रोमहर्षक आठवणी सोबत घेऊन पुन्हा आपापल्या शहराकडे परतले, तर काहींनी शहरात मुक्काम करून नाशिक पर्यटनाचा बेत आखला आहे.
देशी-विदेशी संगीताच्या तालावर ठेका धरणाºया आंतरराष्ट्रीय ‘सुला फेस्ट’चा जल्लोषात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:19 AM
नाशिक : देशी-विदेशी संगीताच्या तालावर ठेका धरणाºया आंतरराष्ट्रीय सादरीकरणाने ‘सुला फेस्ट-२०१८’चा रविवारी (दि.४) जल्लोषात समारोप झाला.
ठळक मुद्देवाइन पर्यटनाचा आस्वाद तरुणाईमध्ये उत्साह संचारला