नाशिक : मानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला शनिवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. दहा वाजून दहा मिनिटाला खतीब यांनी नमाजपठणाला प्रारंभ केला. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरुदोसलामचे उपस्थित जनसमुदायाकडून पठण करण्यात आले. अकरा वाजता सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सातपूर परिसरात ईद साजरीसातपूर येथील रझविया मशिदीत पवित्र रमजान ईदनिमित्त नमाजपठण केल्यानंतर एकमेकांनी गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. अन्य नागरिकांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्ताने सातपूर येथील रझविया मशिदीत मौलाना शुजाउद्दीन यांनी ईद उल फित्रची नमाज पठन केली. यानंतर राज्यात भरपूर पाऊस पडू दे. देशात सर्वत्र शांतता नांदू दे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. रझविया मशीद ट्रस्टचे फारूक खान पठान, शरीफ शेख आदिंनी स्वागत केले. याप्रसंगी मनसे गटनेते सलीम शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे, रिपाइं गटनेते दीक्षा लोंढे आदींसह गोकूळ निगळ, शांताराम निगळ, नितीन निगळ, रामहारी संभेराव, अरु ण काळे, रवींद्र उगले, भिवानंद काळे, अनिस शेख, सलीम शेख, हशमत शेख, अकिल शेख, शकील शेख, मोसिन शेख आदींसह उपस्थितांनी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊनही शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवरे, संदीप वºहाडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.ईदचे नमाजपठण पार पडल्यानंतर आपल्या नातेवाइकांच्या घरी हजेरी लावून समाजबांधवांनी ईद मुबारक अशा शब्दात शुभेच्या दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार खास खाद्यपदार्थ शिरखुर्म्याने करण्यात आला. शिरखुर्म्याच्या गोडव्याप्रमाणे नातेसंबंधातील गोडवा वाढावा, अशीच अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, मुस्लीम बहुल परिसरात दिवसभर शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला जात असल्याने सुगंध दरवळला होता.विश्वाच्या कल्याणासाठी दुआनमाजपठणानंतर खतीब यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व विश्वशांतीकरिता विशेष दुआ केली. यावेळी शहरासह संपूर्ण देशाचे संरक्षण तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठीही प्रार्थना करण्यात आली. समाजातील सर्वच घटकांच्या विकासाकरिता खतीब यांनी दुआ मागितली. उपस्थित हजारो नागरिकांनी त्यांच्या प्रार्थनेला ‘आमीन’ शब्द उच्चारत प्रतिसाद दिला.लोकप्रतिनिधी अधिकाºयांची उपस्थितीईदनिमित्त ईदगाह मैदानावर महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, विनायक खैरे, गजानन शेलार, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खतीब यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:26 AM