महाविद्यालयीन तरुणांमध्ये हक्काबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपप्राचार्य आर. व्ही. पवार यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर हक्कांची जी स्थिती निर्माण झाली ती विद्यार्थ्यांसमोर विशद करून संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेले योगदान स्पष्ट केले. प्रास्तविकात राज्यशास्र विभागप्रमुख प्रा. प्रवीण शिंदे यांनी मानवी हक्कांच्या संदर्भात राजकीय विचारवंतांचे हक्काबाबतचे विचार स्पष्ट केले. प्रा. नितीन जाधव यांनी मानवी हक्कांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाचे योगदान सांगून भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची माहिती दिली. तसेच भारतातील हक्कांची वास्तव परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेऊन स्रियांचे हक्क, बालकांचे हक्क व वंचितांचे हक्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. एस.एन. पगार, राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा. प्रवीण शिंदे, प्रा. एन. के. जाधव, डॉ. मोहन कांबळे, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मनोज मगर यांनी आभार मानले.
सिन्नर महाविद्यालयात जागतिक मानवी हक्क दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:01 PM