शहरातील ब्राह्मण समाजाचे विठ्ठल मंदिर रामसेतू पुलाजवळील धान्य बाजारात आहे. तसेच आझाद चौकात शंभर वर्षापूर्वीचे मंदिर आहे. संगमेश्वरातील संत सावता महाराज मंदिरात विठ्ठल-रखुमाईची सुबक मूर्ती आहे. तसेच कॅम्प भागातही पेंढारी समाजाचे छत्रपती शिवाजीवाडीत जुने मंदिर आहे. या सर्व मंदिरात आज सकाळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची विधिवत पूजा आरती करण्यात आली होती. मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती.
संगमेश्वरात नगरसेवक सखाराम घोडके, कृउबा संचालक संजय घोडके, रवींद्र सूर्यवंशी, मामको बॅंक संचालक अशोक बैरागी, सावता मंदिराचे विश्वस्त पंढरीनाथ महाजन आदींनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे सावता महाराज मंदिरात पूजन केले.
सावता महाराज मंदिरात दिवसभर अमर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना उपवासाचे पदार्थाचे वाटप केले. यात ६० किलो साबुदाणा खिचडी, १०१ डझन केळी, ३१ किलो खजूर, ११ किलो राजगिरा लाडू वाटप केले. भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. साधना वाचनालयात विठू माउलीच्या प्रतिमेचे पूजन करून धार्मिक ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
चौकट : गेल्या शंभर वर्षाची परंपरा असलेली ‘नगर प्रदक्षिणा फेरी’ मात्र कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षीही निघू शकली नाही. संगमेश्वरातील महादेव मंदिरापासून विठुनामाचा गजर करीत हाती भगवे झेंडे व टाळ, मृदुंगाच्या निनादात निघणारी फेरी श्रद्धाळू भाविकांचे मोठे आकर्षण असते. दरवर्षी यात महिला भजनी मंडळासह भाविक मोठ्या संख्येने सामील होतात. यंदाही फेरी निघू न शकल्याने भाविकांचा हिरमोड झाला. शंभर वर्षाची परंपरा खंडित झाल्याने महादेव मंदिराचे विश्वस्त पंढरीनाथ अस्मर यांनी सांगितले.
फोटो फाईल नेम : २० एमजेयूएल ११ . जेपीजी
फोटो कॅप्शन : आषाढी एकादशीनिमित्त संगमेश्वरातील सावता मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीच्या पूजनप्रसंगी नगरसेवक सखाराम घोडके, संजय घोडकेसह उपस्थित भाविक.
200721\20nsk_57_20072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.