येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर व कॉलनी भागातील सातही दत्तमंदिरात सायंकाळी उशिरापर्यत दर्शनासाठी भाविकाची गर्दी उसळलेली होती.येवल्यातील पारेगाव रोड वरील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सवासह नाम-जप-यज्ञ साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गुरुचरित्र पारायणाचे वाचन १२१ सेवेकऱ्यांनी केले. सातही दिवस विविध यागांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, गीताई याग, स्वामी याग, रु द्र याग यासह १० यागांचे आयोजन विधीपूर्वक करण्यात आले. प्रहर सेवेत अखंड वीणावादन अखंड स्वामीजप, स्वामीचरित्र वाचन करण्यात आले. बुधवारी दत्तजयंती निमित्त श्री गुरूदत्तचा तिसरा अध्याय वाचुन महाआरती व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरु वारी (दि.१२) सत्यदत्त पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. या यज्ञ सप्ताहात श्रीगुरूचिरत्र व श्रीमतभागवत पारायणासाठी मोठ्या संखेने सेवेक-यांनी सहभाग घेतला. दत्तात्रेय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांनी कार्याक्र माचे यशस्वी आयोजन केले. त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त हुडको वसाहतीत अष्टविनायक ग्रुप तर्फे वसाहतीतील दत्त मंदिरात पूजा-अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस आगारात व शहर पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक मोरे, चंद्रकांत निर्मळ यांनी श्रीदत्ताला अभिषेक करून पूजन केले. सावरगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरु देव दत्त विश्वस्त संस्थेत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संजय (बापू) कुलकर्णी यांच्या हस्ते दत्ताच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. गोविंदनगर येथील मंदिरात दत्तपूजन करण्यात आले. दत्तवाडी येथे उमाकांत महाराज यांच्या हस्ते दत्तपूजा करण्यात आली.
येवला शहरात दत्तजन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 6:40 PM
भाविकांची गर्दी : ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम
ठळक मुद्देपारेगाव रोड वरील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सवासह नाम-जप-यज्ञ साप्ताहाचे आयोजन