टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी शेण, गोमूत्र व रक्षा यापासून स्वहस्ते श्री मारुतीची मूर्ती स्थापन केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते स्थापित ही देशातील पहिला गोमय मारुती मूर्ती आहे. कोविड महामारीमुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. गुरुजी रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक, आरती करण्यात आली. विश्वस्त मंडळाचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्रा.राम कुलकर्णी, ॲड.भानुदास शौचे, अर्चना रोजेकर, व्यवस्थापक जुन्नरे, जयेश कुलकर्णी यांनी भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. भक्तांचे दर्शनासाठी मारुतीचा आजचा पूजेनंतरचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाठविला. देवळाली गावातील श्री दक्षिण मुखी, श्री दंड्या, रोकडोबावाडीतील श्री रोकडोबा महाराज मंदिरातही साधेपणानेच महापूजा व आरती करण्यात आली. सिन्नरफाटा, उपनगर, जेलरोड, दसक-पंचक, शिंदे, पळसे, विहीतगाव येथील हनुमान मंदिरातही उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. कोरोना संकटामुळे भंडारा व इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
नाशिक रोडला हनुमान जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:16 AM