पिंपळगाव बसवंत : सत्तरहून अधिक द्राक्ष उत्पादकांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दहा दिवसांपूर्वी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर फरार असलेल्या मुख्य व्यापाऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघा व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दि. १६) पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे .पिंपळगावचे शेतकरी रमेश खैरे, तळेगाव वणीचे गणपत सरोदे तर खेरवाडी येथील संदीप संगमनेरे यांच्या सह अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओझर येथील आदित्य ॲग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी, नीलेश दवंगे (रा. खेडगाव) यांनी द्राक्षमाल खरेदीकरून शेतकऱ्यांना खोटे धनादेश देत जवळपास दोन कोटी ४२ लाख ४६ हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.आर्थिक गुन्हे शाखेची कारवाईआर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका व्यापाऱ्याला अटक केली. त्यानंतर मुख्य व्यापाऱ्याचा सुगावा लागताच आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही संशयित आरोपींना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची१४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र चौधरी, पिंपळगावचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.
फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:22 AM
सत्तरहून अधिक द्राक्ष उत्पादकांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दहा दिवसांपूर्वी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर फरार असलेल्या मुख्य व्यापाऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघा व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दि. १६) पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे .
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांची दोन कोटी ४२ लाखांची फसवणूक