दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी मंजूर केलेले तीन काळे कायदे मागे घेतले नाहीत व शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केलेला हमीभावाचा कायदा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. त्याचा निषेध यावेळी करण्यात आला, तसेच शेतकरीविरोधी तीन काळे कायदे परत घ्या, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा किमान हमीभाव देण्याचा कायदा करा, शेतमालाचे आयात-निर्यात याचे निश्चित धोरण करा, या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध करीत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरावर काळे झेंडे लावून काळा दिवस पाळला. यावेळी ज्येष्ठ नेते भास्करराव शिंदे, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, किरण डावखर, संतोष सोनवणे, रंगनाथ जिरे, बळीराम सोनवणे, नवनाथ ठाकरे आदी उपस्थित होते.
फोटो- २६ तळेगाव रोही
चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे केंद्र सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करताना भास्करराव शिंदे, सुखदेव केदारे, किरण डावखर, संतोष सोनवणे, रंगनाथ जिरे, बळीराम सोनवणे, नवनाथ ठाकरे आदी.
===Photopath===
260521\26nsk_38_26052021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ तळेगाव रोही चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे केंद्र सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवुन निषेध करताना भास्करराव शिंदे, सुखदेव केदारे ,किरण डावखर, संतोष सोनवणो, रंगनाथ जिरे ,बळीराम सोनवणे, नवनाथ ठाकरे आदि.