कसबे सुकेणे : राज्य आणि केंद्रातील सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या विरोधात संघटितपणे संघर्ष करीत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.कसबे सुकेणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस , कांदा, द्राक्ष परिषद व संघर्ष सभेत ते बोलत होते. सरकारला नमविण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असून, मोदी सरकारमुळे शेती व्यवस्था पुरती कोलमडल्याचे ते म्हणाले. शेतकरी हितासाठी झटणाऱ्यांना निवडून देण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले महिला आघाडीच्या पूजा मोरे, राजेंद्र मोगल, संदीप जगताप, दशरथ सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना खासदार शेट्टी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
केंद्र, राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:02 AM