नाशिक : जिल्'ातील जवळपास अकराशे गावांची पीक पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या दिल्लीच्या केंद्रीय समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना कमी पैसेवारी असलेल्या गावांना भेटी देऊन त्याची खात्री करण्याचे आदेश बजावल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. समितीच्या पाहणी दौऱ्यावरच शेतकऱ्यांची आर्थिक मदत अवलंबून आहे. यंदा पावसाचे उशिरा आगमन व त्यानंतर दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला असून, महसूल यंत्रणेने सप्टेंबरमध्ये केलेली नजर पैसेवारी व त्यानंतर आॅक्टोबरमध्ये केलेल्या सुधारित पैसेवारीत नाशिक जिल्'ातील तेरा तालुक्यातील सुमारे अकराशे गावांची पैसेवारी ५० पैशांहून कमी आहे. राज्यात मराठवाड्यानंतर नाशिक जिल्'ात इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी पैसे वारीचे गावे लक्षात आल्यामुळे राज्य सरकारने प्रधान सचिवांना प्रत्यक्ष भेटी देऊन खात्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक येथे गेल्या महिन्यातच श्रीकांत सिंह या नगरविकास सचिवांनी येऊन काही गावांना भेटी दिल्या, तर महसूल, कृषी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून पिकांचे उत्पादन ठरविण्याबाबत बजावले होते
केंद्रीय पाहणी समितीचा धसका पीक पैसेवारीची खातरजमा : आयुक्तांचे आदेश
By admin | Published: December 12, 2014 1:50 AM