ओझर : आज उद्योग ज्या स्थितीतून मार्गक्र मण करीत आहे ते पाहता संरक्षण खात्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यासाठीच लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारने केंद्रबिंदू ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुमारे २८ हजार कोटींच्या आॅर्डर देण्यात आल्या आहेत. नाशिकला घोषित झालेले डिफेन्स इनोव्हेशन हब सर्वार्थाने वरदान ठरेल. संरक्षण क्लस्टर बनलेल्या नाशिकचा विकास यानिमित्ताने घडून येणार असून त्यासाठी केंद्र सरकार लघु व मध्यम उद्योगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे बोलताना दिली.नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा झाल्यानंतर त्याचे उद्घाटन ओझर टाऊनशिपच्या कम्युनिटी हॉलमध्ये गुरुवारी (दि.१७)आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. सुभाष भामरे बोलत होते. व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण खात्याचे सचिव व विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी क्लस्टरचा दाखला देत समृद्धी महामार्ग नाशिकहून जात असताना त्यात आजच्या स्टेकहोल्डर सेमिनारमध्ये इतक्या निविदा निघाल्या आहेत. राजधानी एक्सप्रेस नाशिकहून जाणार आहे. यासर्व बाबींचा विचार करता आगामी काळात नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवेल. त्यामुळे सर्वच क्षेत्रात विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, प्रा. देवयानी फरांदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, उद्योजक धनंजय बेळे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योग समितीचे सचिव आशिष नहार, डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप पेशकार राजेंद्र अहिरे, मिलिंद राजपूत, संजय राठी, शशिकांत जाधव, हरिशंकर बॅनर्जी, ललित बूब, किरण वाघ, दिनेश करवा, एच ए एल कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके,सरचिटणीस सचिन ढोमसे यांचेसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकार लघु-मध्यम उद्योगांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 4:31 PM
सुभाष भामरे : नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबचे उद्घाटन
ठळक मुद्देनाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा झाल्यानंतर त्याचे उद्घाटन ओझर टाऊनशिपच्या कम्युनिटी हॉलमध्ये गुरुवारी (दि.१७)आयोजित करण्यात आले होते.