मनमाड/सटाणा/पिंपळगाव (ब) : धनाढ्य लोकांच्या कर्जाची जबाबदारी घेणाºया केंद्र सरकारने रात्रंदिवस काबाडकष्ट करणाºया शेतकºयाला मात्र वाºयावर सोडले. धनिकांच्या मागे उभे राहाणाºया या सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सभांमध्ये बोलताना केले.लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वातावरण वेगळे होते त्यामुळे लोकांची फसगत झाली. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. महाराष्टÑाचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गडकिल्ल्यांना पर्यटनाची केंद्र करून दारूचे अड्डे बनविण्याचा प्रयत्न करणाºया भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे पवार मनमाडमध्ये म्हणाले, तर राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यावर उपाययोजना करण्यातसरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी सटाणा येथील सभेत केला. (पान ४ वर)(पान १ वरून) मोदी व शहा यांना महाराष्ट्रात आल्यावर माझे नाव घेतल्याशिवाय चैनच पडत नसल्याचेही पवार पिंपळगावमध्ये बोलताना म्हणाले.मनमाड येथे व्यासपिठावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, संजय पवार, जयंत जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर, साहेबराव पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अफजल शेख आदी उपस्थित होते. उमेदवार पंकज भुजबळ यांनी यावेळी मनोगतातून नांदगाव मतदार संघात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा सादर करून यापुढेही मतदार संघाच्या विकासाची संधी द्यावी असे आवाहन केले.पिंपळगाव येथे विनायकदादा पाटील, उमेदवार दिलीप बनकर, राजेंद्र डोखळे, श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तानाजी बनकर, सरपंच अलका बनकर, राजाराम पानगव्हाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर सटाणा येथे उमेदवार सौ. दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, रवींद्र पगार, शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, यतीन पगार ,विजय वाघ ,रामचंद्र पाटील ,यशवंत अहिरे आदी उपस्थित होते .नारपारचे पाणी नांदगावपर्यंत आणणारनारपार योजनेचे पाणी नांदगाव तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विरोधात बोलले की इडीच्या शस्राचा धाक दाखवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. तोच प्रयत्न बॅँकेशी कुठलाही संबंध नसताना पवार यांच्या बाबतीत केला गेल्याचा आरोप करीत पवार यांचे बळ वाढविण्यासाठी राष्टÑवादीला विजयी करण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाºयावर सोडले: शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:21 PM
धनाढ्य लोकांच्या कर्जाची जबाबदारी घेणाºया केंद्र सरकारने रात्रंदिवस काबाडकष्ट करणाºया शेतकºयाला मात्र वाºयावर सोडले. धनिकांच्या मागे उभे राहाणाºया या सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सभांमध्ये बोलताना केले.
ठळक मुद्देमनमाड, पिंपळगाव, सटाण्यात जाहीर सभा