कळवण : कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन ८५० डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याचे सांगून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली असल्याने कांदा उत्पादक शेतकरीचे नुकसान होणार असल्याने निर्यातमूल्य वाढविणे चुकीचे आहे, असे मत कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल अशी आशा सरकारला वाटतेय. तर हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले. यंदा कांद्याचं उत्पादन मुळातच कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव फारसे कमी होणार नाहीत असे कांदा व्यापारी हेमंत बोरसे व सुनील महाजन यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्यावरून थेट ८५० डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरु वारी घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून कांद्यावर निर्यातमूल्य आकारले जात नव्हते. मात्र, वाणिज्य मंत्रालयाच्या गुरु वारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात घटणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे. - धनंजय पवार, सभापती, कळवण बाजार समितीजनतेला महाग कांदा खरेदी करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला तेजी आली आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा ४४४० रु पये प्रतिक्विंटल भावाने विकला गेला. शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळू लागल्याने हे सहन झाले नाही. - रवींद्र देवरे, माजी सभापती, अर्थ समिती, जि. प
केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:51 PM
कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्दे कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन कांदा उत्पादक शेतकरी संतप्त