कळवण : बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या भावात घसरण होत आहे. उन्हाळ कांदा सरासरी १७५०, तर लाल कांदा ???? रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. सरकारने निर्यात खुली न केल्यास दरातील घसरण सुरूच राहणार आहे. त्यामुळे दर स्थिर ठेवण्यासाठी कांदा निर्यात खुली करण्याची मागणी कळवण तालुका शेतकरी संघटना व कांदा उत्पादक संघटनेने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम केले आहे. नाशिक जिल्ह्यातच कांदा आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वातावरण बदलामुळे कांदा चाळीतच मोठ्या प्रमाणात सडून नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अस्मानी अशा सुल्तानी संकटात सापडला असताना त्यातच ही कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरीवर्गात तीव्र अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कांदा निर्यात खुली करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार डॉ. तृप्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ओंकार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, विनोद खैरनार, योगेश पगार, प्रल्हाद गुंजाळ, युवराज वाघ, राजेश शिरसाठ, विजय पाटील, रामा पाटील, दादाजी जाधव, किशोर पवार, तुषार पाटील, मुन्ना आहेर, अमित पवार, शरद आहेर, पवन रौंदळ, संजय रौंदळ, रामदास आहेर, योगेश पाटील, दिलीप शेवाळे, रमेश बच्छाव, दादा जाधव आदी उपस्थित होते.
सध्या भाजीपाल्याला दर मिळत नसून इतर नगदी पिकांचीही अशी स्थिती राहिली तर शेती व्यवसाय हा अडचणीत सापडण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. राज्यात सध्या लाल कांद्याचे उत्पादन होत असून, त्याची आवक वाढली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवली होती; परंतु त्याची साठवण क्षमता संपत आली असून, तो खराब होण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी तो विक्रीला आणण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही नवीन कांदा बाजारात दाखल होत असल्याने दरात घसरण होत आहे.
===Photopath===
041220\04nsk_11_04122020_13.jpg
===Caption===
कांदा निर्यात खुली करण्याची मागणीचे निवेदन नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश तृप्ते यांना देतांनाविलास रौंदळ, बाळासाहेब शेवाळे, अंबादास जाधव ओंकार पाटील, विनोद खैरनार, योगेश पगार, प्रल्हाद गुंजाळ, युवराज वाघ, राजेश शिरसाठ, विजय पाटील, रामा पाटील, किशोर पवार आदी.०४ कळवण १