लासलगांव :-- : केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. सदर कांद्याची खरेदी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रातील नाशिक ,अहमदनगर ,पुणे , केंद्रावर सुरू करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रावर काही प्रमाणात नाराज असलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शहरी भागातील ग्राहकांनाही यातून दिलासा मिळेल. देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते. आतापर्यंतच्या दरवर्षी होणाऱ्या खरेदीपेक्षा सर्वात मोठी खरेदी नाफेड करणार आहे. यात महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन कांदा तर गुजरात मधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून या खरेदीला सुरु वात होणार आहे. आपत्तकालीन पुरवठ्याअंतर्गत दरवर्षी १३ हजार ५०० मेट्रीक टन पर्यंतचा कांदा आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे. पण यावेळी विक्र मी ५० हजार मेट्रीक टन कांद्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रीक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रीक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे.------------------------मागील वर्षी भाव स्थिरीकरण निधीतून दिलेले टार्गेट पूर्ण झाल्यामुळे यावर्षी एिप्रलच्या पहिल्या आठवड्यात ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेड व्यतिरिक्त शेतकरी समूह गट शेतकरी कंपन्या यामार्फत पुणे नाशिक नगर धुळे येथे खरेदी करण्यासंदर्भात नाफेड एमडी यांची पुणे येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या योजनेअंतर्गत ज्यावेळेला कांद्याचे भाव पडले राहतात तेव्हा या निधीतून कांदा खरेदी करून शेतकर्यांना दोन पैसे मिळतात जेव्हा कांद्याचे भाव वाढलेले असतात तेव्हा शहरी ग्राहकांना याचा फटका बसू नये त्यासाठी ना नफा ना तोटा या धर्तीवर सदर कांदा बाजारात आणला जातो.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड ,नवी दिल्ली
केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 5:58 PM