लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मुंबई येथे सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाडकरांसह चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी नाशिक, मुंबई येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पावसामुळे ठप्प झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. स्थानकात फलाट क्रमांक ३ वर प्रवाशांच्या सेवेसाठी माहिती कक्ष उघडण्यात आला आहे.मनमाड येथून असंख्य चाकरमाने गोदावरी व राज्यराणी एक्स्प्रेसने दररोज कामानिमित्त नाशिक व मुंबई येथे जा-ये करतात. या दोन्ही गाड्या रद्द झाल्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचता आले नसल्याने त्यांचा खाडा झाला आहे. याबरोबरच मुंबई- साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने साईभक्तांचे हाल झाले. यावर मात करण्यासाठी काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत आहेत.मुंबई येथून सुटणाºया अनेक एक्स्प्रेस, मेल गाड्यांबाबत अनिश्चितता आहे. उत्तर भारतातून येणारी हावडा- मुंबई मेल मनमाड स्थानकात थांबवून मनमाड स्थानकातून नियोजित वेळेत परतीच्या प्रवासासाठी रवाना करण्यात येणार आहे. मुंबई-हैदराबाद सुफरफास्ट एक्स्प्रेस, दादर-चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई-बिदर एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत.हावडा मेल थांबविली रद्द करण्यात आलेल्या गाड्या१) गोदावरी एक्स्प्रेस२) राज्यराणी एक्स्प्रेस३) साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरमनमाड-इगतपुरी मार्गे वळविण्यातआलेल्या गाड्या१) हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट२) दादर-चैन्नई एक्स्प्रेस३) मुंबई-बिदर एक्स्प्रेसहावडा-मुंबई मनमाड येथे थांबवून नियोजित वेळी येथूनच पुन्हा हावडाकडे प्रवास करणार आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड स्थानकातून सुटणाºया राज्यराणी व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक गाड्या मनमाडमार्गे वळविण्यात आल्या असून, प्रवाशांच्या सेवेसाठी फलाट क्रमांक ३ वर सहायता केंद्र सुरू उघडण्यात आले आहे.- एस. के. गलांडे, स्टेशन प्रबंधक, मनमाड
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:40 PM
मनमाड : मुंबई येथे सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाडकरांसह चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी नाशिक, मुंबई येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
ठळक मुद्देमनमाड : रद्द झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल