शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; चाकरमान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:46 PM

मनमाड, घोटी : मध्य रेल्वेच्या कसारा आसनगांव दरम्यान उंबरमाळी जवळ रेल्वेची ओव्हरहेड दुरस्ती करणारी रेल्वे गाडी मुंबईकडे जात असतांना पहाटेच्या सुमारास रेल्वे रु ळावरून घसरल्याने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

मनमाड, घोटी : मध्य रेल्वेच्या कसारा आसनगांव दरम्यान उंबरमाळी जवळ रेल्वेची ओव्हरहेड दुरस्ती करणारी रेल्वे गाडी मुंबईकडे जात असतांना पहाटेच्या सुमारास रेल्वे रु ळावरून घसरल्याने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. या अपघातामुळे सकाळी मुंबईला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कसाºयाहून मुंबईला जाण्यासाठी एकही लोकल न आल्याने वासिंद स्थानकातील प्रवाशांनी संतप्त होत रेल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत रेलरोको केला. यामुळे पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणार्या काही गाड्या कसारा, इगतपुरी, देवळाली स्थानकावर थांबवण्यात आल्या. अखेर बºयाच प्रवाशांनी वैतागुन मुंबई आग्रा महामार्गावर येत मिळेल त्या वाहनांनी इच्छीत स्थळी जाणे पसंत केले. लांब पल्ल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून इगतपूरीपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी चार ते पच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. गुरु वारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर दुरु स्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकातरु ळावरून घसरली. पहाटेपासून रु ळावरु न घसरलेली व्हॅन रु ळावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यानच मुंबईकडे येणाºया लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या. सकाळपर्यंत दुरु स्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे कसारा स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नाही. त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.------------------मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प : दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस,अमृतसर मुंबई एक्स्प्रेस, गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस,शालिमार एलटीटी एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल व्हाया नागपूर,नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, फिरोजपूर मुंबई पंजाब मेल, सिकंदराबाद मुंबई देविगरी एक्स्प्रेस, भुसावळ पुणे एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेसमनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

टॅग्स :Nashikनाशिक