नाशिकमध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी निर्माण झालेल्या भयावह स्थितीमुळे नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली. मात्र, एप्रिल महिन्यातच लसींचा डोस आटला. शहरातील निवड केंद्रांवरच डोस दिले जात असल्याने त्या परिसरातील नागरिकांची देखील गर्दी होऊ लागली. अनेक ठिकाणी तर पहाटेपासून नागरिक रांगा लावत असतात. यासंदर्भात बऱ्याच घडामोडी देशपातळीवर घडल्यानंतर केंद्र शासनाने लसी पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. २१ जूनपासून राज्यांना मुबलक लस पुरवठा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, दहा दिवसांत अवघ्या ३५ हजार ५४० लस मिळाल्या आहेत. त्यामुळे तेरा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट कधी पूर्ण होणार असा प्रश्न आहे.
इन्फो...
दहा दिवसांत उपलब्ध लस
तारीख मिळालेले डोस
२१ जून १५,०००
२३ जून २०००
२५ जून ११,७९०
२७ जून ४,७५०
२८ जून २००० (सिव्हील हॉस्पिटल)
इन्फो....
दुसऱ्या डोससाठी धावपळ
शासनाने कोविशिल्ड लस घेणाऱ्या नागरिकांना दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे करण्यात आले आहे. तसेच कोव्हॅक्सीनचे अंतर मात्र पूर्वीप्रमाणेच २८ दिवसांचे आहे. ज्या नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे त्यांना कालावधी उलटूनही डोस मिळालेला नाही.
कोट..
नाशिक शहराला प्राप्त झालेल्या डोसनुसार रोज डोस देण्यात येत आहेत. शहरातील लहान मुले वगळता एकूण १३ लाख नागरिकांना डोस द्यावे लागणार असून त्यादृष्टीने महापालिका प्रशासन सज्ज आहे.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
इन्फो....
एकूण लससाठी लाभपात्र नागरिक १३,००,०००
पहिला डोस- ३,५७,२५२
दुसरा डोस-१,०८,३१०
एकूण लसीकरण- ४,६५,५६२