नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांनी धनादेश वठत नसल्याच्या निषेर्धात आक्र मक भूमिका घेत मंगळवारपासून (दि.२२) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. ‘सीईओ तुझा ठेकेदारांवर भरवसा नाही काय’ असे गाणे सादर करत धनादेशाचे पैसे मिळालेच पाहिजे, अशा घोषणाबाजी ठेकेदारांनी यावेळी केली. दरम्यान, जि. प. ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनात ठेकेदारांनी निर्देशने केली. यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदारांनी संघर्ष, धनादेश लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. आजवर झालेल्या बैठकांमधून ठेकेदारांच्या बिलाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले. मात्र, आजतागत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ठेकेदार मानसिक व आर्थिक तणावात असल्याचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष विनायक माळेकर यांनी सांगितले. प्रशासनाने ठेकेदारांच्या धनादेशबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास जि. प. च्या विकासकामांमध्ये ठेकेदार सहभागी होणार नाही.
सीईओ तुमचा ठेकेदारांवर भरवसा नाय काय, नाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:21 PM