नाशिक: जिल्ह्यात कोरेाना रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाच्या आदेशानुसार १५ तारखेपासून काही निर्बंध अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. लग्न सोहळ्यांना आता लॉन्स, मंगलकार्यलयांमध्ये परवानगी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यांना खासगी जागेत कमीत कमी ५० लोकांच्या उपस्थितीत सोहळा आटोपता घ्यावा लागणार आहे. तर खासगी आस्थापनांना ५० टक्के उपस्थिती किंवा वर्क फ्रॉम होमची कार्यवाही करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या दहा तारखेपासून कोरोना निर्बधाचे आदेश लागू करण्यात आले. त्यामध्ये आता अधिक कठोर कार्यवाही केली जाणार असून बाजारापेठेत कुठेही गर्दी होणार नाही याकडे अधिक कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. अर्थव्यवहार सुरळीत ठेवण्याबरोबरच गर्दी देखील होणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाणार आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये पुढील आदेशप्रमाणे पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. पालकांच्ाय संमतीने ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू ठेवता येऊ शकते. जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या पालावधीतच सुरू राहतील मात्र अत्यावश्यक सेवा, जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, फळे किराणा दूध, वृत्तपत्र वितरण यांना हे आदेश लागू राहाणार नाहीत.
आठवडे बाजार हे पुर्वीच्या आदेशाप्रमाणेच पुर्णपणे बंद राहाणार आहेत. नियोजित लग्न सोहळे फक्त १५ तारखेपर्यंतच करता येणार होते. आता लॉन्स, मंगलकार्यलयांमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी दिली जाणार नाही. खाद्यगृहे परमीट रूम, बार हॉटेल्स हे सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत केवळ ५० टक्के क्षमतेचे सुरू राहाणार आहे. जीम, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, स्विमिंग पूल वैयक्तिक सरावासाठीच सुरू राहातील. धामिर्क स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात याच वेळषत सुरू राहतील.
जिल्ह्यातील सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स थिएटर, हॉटेल रेस्टॉरंट क्षमतेच्या ५० टक्के व्यकक्तींना उपस्तिती बंधनकारक राहाणार आहे. शॉपिंग माॅल्समध्ये देखील निर्धारीत वेळेत सर्व नियमांचे पालन करूनच सुरू रााहतील. अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे.