नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट ५ मे रोडी होणार आहे. त्यामुळे एमएचटी सीईटीला ४व ५ मे असे दोन दिवस दोन्ही सत्रांतील, तर ६ मे रोजी सकाळच्या सत्रात विराम देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार च्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार असून दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी बारापासून होईल. तर अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी दोन ते पावणेसात या वेळेत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी साडेसातपासून साडेआठपर्यंत प्रवेश दिला जाईल. दुपारच्या सत्रात दोनला सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी साडेबारा ते दीडच्या दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. विषयनिहाय दीड तासांचे सलग पेपर होणार आहे. दरम्यान, परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत संकेतस्थळावर अॅडमिट कार्ड उपलब्ध होणार अशून लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र मिळवावे लागणार आहे.
‘नीट’साठी सीईटीला ४ व ५ मे रोजी विराम ; वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 4:56 PM
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित नीट ५ मे रोडी होणार आहे. त्यामुळे एमएचटी सीईटीला ४व ५ मे असे दोन दिवस दोन्ही सत्रांतील, तर ६ मे रोजी सकाळच्या सत्रात विराम देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देनीट मुळे सीईटीची परीक्षा दोन दिवस राहणार बंद सीईटी परीक्षार्थिंनाही नीट देण्याची संधी संकेतस्थळावर एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जाहीर