शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेली सीईटी सुरळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 4:32 PM

इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी जवळपास ७ ते ८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून यात नीट व जेईई परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे सीईटी  परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देइंजिनियरिंग, फार्मसीसाठी पहिल्यांदाच झाली ऑनलाईन सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार २ ते १३ मे दोन सत्रांत सीईटीनीटमुळे ४ व ५ मे व ६ मे रोजी सकाळच्या सत्रात सीईटीला विराम

नाशिक : इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी जवळपास ७ ते ८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून यात नीट व जेईई परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे सीईटी  परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांकडून सांगितले जात आहे. नाशिकमध्ये सीईटी परीक्षेला गुरुवारपासून (दि.२) सुरुवात झाल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार २ ते १३ मे या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली.  या परीक्षेला ४ व ५ मे   व ६ मे रोजी सकाळच्या सत्रात नीट परीक्षेमुळे सीईटीला विराम देण्यात आला होता. त्यानंतर मात्र नियोजित वेळापत्रकानुसार ६ मे रोजी दुसºया सत्रापासून ते १३ मेपर्यंत ही परीक्षा सुरळीत पार पडली. नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर  राज्यभरातून सुमारे ३ लाख ९६ हजार विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षाही दिली असून त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देण्याचे टाळल्याने या परीक्षेला साधरणाते सरासरी ९२ ते ९३ टक्क्यांपर्यंत पर्यंत उपस्थिती दिसून आले.  यावर्षी सीईटी परीक्षा देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते.  यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित  (पीसीएम), तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र,  रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसारच आखण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे रोज दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत, तर दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी बारापासून परीक्षा झाली. अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी दोन वाजेपासून घेण्यात आली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी