- संकेत शुक्लनाशिक - महाज्योती, सारथी, बार्टी पीएचडी फेलोशिप परीक्षेसाठी रविवार दि. २४ रोजी राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या पहिल्याच प्रवेश पात्रता परीक्षेत गोंधळ जाल्याच आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेसाठी २०१९ साली सेट परीक्षेसाठी वापरलेली प्रश्नपत्रिका जशीच्या तशी वापरण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. परीक्षेसाठी राज्य शासनाच्या तज्ज्ञांची टीम कार्य करीत असताना जुनीच प्रश्नपत्रिका कशी वापरली गेली? फेलोशिप मिळवण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी प्रयत्न करीत असताना या परीक्षांसाठी प्राध्यापकांची टीम बोलावणे, वस्तूनिष्ठ प्रश्नांसाठी समिती गठीत करून परीक्षा होणे अपेक्षीत असताना शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पुणे. मुंबई, नागपुर, अैरंगाबाद या चार केंद्रांवर झालेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्ती दाखल झाले होते. या पेपरमध्ये एकूण५० प्रश्न १०० गुणांसाठी विचारण्यात आलेले होते. सकाळी १० ते ११ यावेळेत परीक्षा पार पडली. या परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका २०१९ मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. ५० प्रश्न जसेच्या तसे आज विचारण्यात आले आहेत. एक प्रकारे हा पीएचडी फेलोशिप घोटाळाच झालेला आहे कारण सेटिंग असलेल्या विद्यार्थ्यांना फक्त तुम्ही 2019 चा पेपर करा तुम्ही शंभर टक्के पास होशाल. अशा प्रकारे हा घोटाळा झालेला आहेत. यापूर्वी महाज्योती, सारथी, बार्टी यांनी पीएचडी फेलोशिप साठी परीक्षा न घेता जे पात्र करत होते. त्यांना सर्वांना पात्र करण्यात येत होते, मात्र ही परीक्षा पहिल्यांदाच घेण्यात आली व ती अशा प्रकारे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे यात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. सीइटीसाठी कोणती प्रश्नपत्रिका येणार याची माहिती काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना आधीच दिली गेलेली असून शकते, त्यामुळे हा पेपर एप्रकारे फुटलेला असून तो पुन्हा घेण्यात यावा अशीही मागणी केली जाते.
सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे ही परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. यासाठी समितीमार्फत अभ्यास करून तयार केलेली प्रश्नपत्रिका येणे आवश्यक होते. मात्र जुनीच प्रश्नपत्रिका वापरण्यात आल्याने या परीक्षेबाबत साशंकता निर्माण होते आहे. - प्रा. दर्शन पाटील, समन्वयक, राज्य पीएचडी नेट सेट विद्यार्थी.