लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी गुरुवारी (दि. ११) घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २० हजार ५७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे.शहरातील ४९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापैकी २५ एमबी ग्रुपकरिता २५ उपकेंदे्र, एमएम ग्रुपकरिता १४, व बीबीग्रुपकरिता १० उपक्रेंदे्र निश्चित केली आहेत. शहरातील विविध केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरात ४९ परीक्षा केंद्रांवर सुमारे १२०० अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर व प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या उपकेंद्रप्रमुख व त्यांचे मदतनीस लिपिक यांनी सीलबंद पाकिटे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आज सीईटी
By admin | Published: May 11, 2017 2:33 AM