शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

चाडेगावच्या मळ्यात बिबट्या आला पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:07 PM

एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे.

ठळक मुद्देपथकाने घटनास्थळी जाऊन पुर्व पाहणी करत बिबट्याचा अंदाज बांधला. एका पिंज-यात बिबट्या भक्ष्याच्या शोधात अडकलाबघ्यांच्या झालेल्या गर्दीमुळे मोहिमेला अडथळा

नाशिक : एकलहरेजवळील मौजे चाडेगाव शिवारात एका शेतामध्ये पुर्ण वाढ झालेला नर बिबट्यालावनविभाग पश्चिम नाशिकच्या रेस्क्यू पथकाने बुधवारी (दि.१०) सकाळी सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. यावेळी बघ्यांच्या झालेल्या गर्दीमुळे मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता.एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. मागील काही दिवसांपासून येथील शेतमळ्यांमध्ये बिबट्या शेतमजूरांना दर्शन देत होता. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी रहिवशांकडून जोर धरू लागली होती. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुर्व पाहणी करत बिबट्याचा अंदाज बांधला. मंगळवारी सकाळी या भागात लावलेल्या एका पिंज-यात बिबट्या भक्ष्याच्या शोधात अडकला अन् नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वनरक्षकांना शेतकऱ्यांनी बिबट्या पिंज-यात आल्याची माहिती कळविली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा पिंजरा सुरक्षितरित्या रेस्क्यू व्हॅनमध्ये ठेवून बघ्यांच्या गर्दीतून गंगापूर रोपवाटिकेच्या दिशेने हलविला.नागरिकांनी सावधगिरीने शेतीवरील कामे उरकावी. सकाळी सुर्योदयानंतरच शेतीवर जावे व सायंकाळी सुर्यास्तापुर्वी शेतीचा परिसर सोडावा, असे आवाहन भोगे यांनी केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव