सटाणा : शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेसह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासकामे कर, निवडणुकीच्या निकालानंतर कोणी कोणाचा दुश्मन नसतो. शहराचा कायापालट करायचा असेल आणि शहरातील सर्व विकासकामे मार्गी लावायचे असतील तर सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा मौलिक सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना दिला.भुजबळ बुधवारी सटाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी सटाणा पालिकेला सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.माझ्यावर काय आरोप झाले तेच तेच उगाळण्यात आता मजा नसून ज्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांसह सर्वजण जातात, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू निर्माण केलेली असताना आणि सरकारचा एक रु पयाही घेतलेला नसताना माझ्यावर ८५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आल्याचे ते म्हणाले. जे झालं ते ठीक आहे; मात्र मी हिंमत हरलेलो नाही आणि हरणारही नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी कार्य करीत राहील. तसेच भाजपा सरकारने मला लोकांमधून संपविण्याचा प्रयत्न केला; मात्र मी संपलो नाही तर जनतेचे प्रेम चार पटींनी वाढल्याचे भुजबळ यांनी सांगितले.प्रास्ताविक राष्ट्रवादीचे गटनेते काकाजी सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन वैभव गांगुर्डे यांनी तर आभार पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी व्यक्त केले.काय म्हणाले नगराध्यक्ष मोरे :यावेळी बोलताना नगराध्यक्ष मोरे म्हणाले,थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा असताना माझा मोठा मताधिक्याने विजय झाला. हा विजय माझा नसून ८० टक्के मतदारांनी मला भुजबळ समर्थक म्हणून निवडून दिल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट करत निवडणुकीच्या वेळी विरोधक माझ्यावर टीका करताना भुजबळांनी सुनील मोरेंना ट्रक भरून पैसे पाठविल्याच्या वावड्या उठवित होते; मात्र भुजबळांनी ट्रक भरून पैसा नाही तर आभाळाएवढं प्रेम पाठविलं होतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. देशाचे संरक्षण राज्यमंत्री यांच्यामुळे विकासाला मोठा हातभार लागत असून, डॉ. भामरे यांच्या सहकार्यामुळेच आपण जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करीत असल्याचे सांगत त्यांनी डॉ. सुभाष भामरे यांचा तब्बल चार ते पाच वेळा आपल्या भाषणात नामोल्लेख केला. (23सटाणा भुजबळ)
विकासकामांसाठी सर्वांना सोबत घ्या छगन भुजबळ : सटाणा पालिकेला सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 6:00 PM
सटाणा : शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेसह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासकामे कर, निवडणुकीच्या निकालानंतर कोणी कोणाचा दुश्मन नसतो. शहराचा कायापालट करायचा असेल आणि शहरातील सर्व विकासकामे मार्गी लावायचे असतील तर सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा मौलिक सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना दिला.
ठळक मुद्दे माझ्यावर काय आरोप झाले तेच तेच उगाळण्यात आता मजा नसून ज्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांसह सर्वजण जातात, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू निर्माण केलेली असताना आणि सरकारचा एक रु पयाही घेतलेला नसताना माझ्यावर ८५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावण्य