शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत

By admin | Published: January 05, 2017 10:56 PM

मालेगाव पंचायत समिती : वडनेर, झोडगे, सौंदाणे गणात होणार चुरस

मालेगाव : आगामी मालेगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री जागेसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे सर्वसाधारण स्त्री आरक्षण असलेल्या वडनेर, सौंदाणे, झोडगे या तिनही गणात चुरशीची लढत होणार आहे. शिवसेना, भाजपामध्येच खरा सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत.विद्यमान सभापती भरत पवार यांचा सौंदाणे गण, विद्यमान जि. प. सदस्य सौ. स्वाती ठाकरे यांच्या गटातील वडनेर गण, शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य ज्योती तलवारे यांच्ोा झोडगे गटातील झोडगे गणही सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाल्याने या तिनही गणांमध्ये सत्ता टिकविण्यासाठी अस्तित्वाची लढाई होणार आहे.मालेगाव तालुक्यात सात गट व १४ गण आहेत. तालुक्यातील करंजगव्हाण, डोंगराळे, कळवाडी, चिखलओहोळ, वडेल, रावळगाव, दाभाडी, पाटणे, चंदनपुरी, निमगाव, जळगाव (निं.) या गणांमध्ये वेगवेगळे आरक्षण आहे तर सभापतीपदासाठी लागणारे आरक्षण वडनेर, सौंदाणे, झोडगे या गणात आहे. त्यामुळे या तिनही गणांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. सेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, भाजपाचे हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सौंदाणे गणात शिवसेनेतर्फे विद्यमान सभापती भरत पवार यांच्या पत्नी सुनिता पवार, शारदा पवार, शेतकरी संघाच्या माजी संचालिका वैशाली पवार, माजी सभापती वंदना पवार, सविता बच्छाव, मनिषा सोनवणे, भाजपातर्फे माजी जि. प. सदस्य रत्नाकर पवार यांच्या भावजयी स्वाती पवार, माजी पं. स. सदस्य पंकज शेवाळे यांच्या पत्नी जयश्री शेवाळे, वऱ्हाणेच्या सरपंच संगीता पवार इच्छूक आहेत. झोडगे गणात शिवसेनेतर्फे विद्यमान जि. प. सदस्य ज्योती तलवारे, माजी सरपंच दिपक देसले यांच्या पत्नी ज्योती देसले, रंजना देसले तर भाजपाकडून सुवर्णा देसाई, सुरेखा उज्जन, सुप्रिया देवरे इच्छुक आहेत. वडनेर गणात विद्यमान जि. प. सदस्य स्वाती ठाकरे, अजिंक्य ठाकूर यांच्या पत्नी या भाजपाकडून तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांच्या पत्नी, शिवसेनेकडून कृष्णा ठाकरे यांच्या आई इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)