जोपर्यंत आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा दोघांनी घेतल्याने वैद्यकीय अधिकारी नागरगोजे यांनी लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यावर लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
कोरोनावर लसीकरण पर्याय असल्याने नागरिक लसीकरण करत आहे. प्रभागाच्या नगरसेवक प्रभाग सभापती शीतल माळोदे यांनी प्रभागात नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आडगावातील नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आडगावमधील मनपा शाळा ६ मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत माळोदे यांनी मनपाकडे पाठपुरावा केला. मात्र, लसीकरण केंद्र सुरू झालेले नाही. नांदूर मानूर लसीकरण केंद्र आडगावपासून लांब असून लस घेण्यासाठी नागरिकांना जाणे शक्य होत नाही त्यामुळे आडगावला लसीकरण केंद्र सुरू करावे, याची मागणी माळोदे यांनी होती.
तीन महिन्यांपासून पाठपुरावा करून मनपा आयुक्त वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नसल्याने सभापती माळोदे यांनी मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनातच तीन तास ठिय्या मांडला. अखेर नागरगोजे यांनी लसीचा पुरवठा झाल्यावर आडगावला केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.