ब्राह्मणगाव : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले व्यवसाय अटी-शर्तींनी का होईना सुरू झाल्याने सर्व दुकानदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच व्यवसायांची वाट लागल्याने दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कुटुंबाचे पालन-पोषण कसे करावे, हे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. आता जिल्ह्यात व ग्रामीण भागातीलही कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राज्य सरकारने व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने थोडाफार का होईना कुटुंबाचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. त्यातच शेतीसाठीच्या सर्व व्यावसायिकांना ही वेळ वाढून दिल्याने शेतकऱ्यांना मदत होणार आहे. कांदा मार्केट सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांच्या हातात खरीप हंगामासाठी लागणारे भांडवल उपलब्ध होणार आहे.-------------------ब्राह्मणगावी अनलॉकनंतर व्यावसायिकांनी उघडलेली दुकाने. (०१ ब्राह्मणगाव)